Ind vs Pak: प्रयागराजमध्ये महाकुंबमेळा सुरू आहे. या मेळ्यात तुफान चर्चेत असलेले बाबा म्हणणे, IITian बाबा. आयआयटी मुंबईतून आपलं शिक्षण पूर्ण करून, चांगल्या पगाराची नोकरी सोडून IITian बाबाने साधू बनण्याचा निर्णय घेतला. जेव्हापासून या बाबाचा व्हिडीओ व्हायरल झालाय, तेव्हापासून हा बाबा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता या बाबाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
सध्या IITian बाबाची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. या बाबाने भारत – पाकिस्तान सामन्याबाबात मोठी भविष्यवाणी केली आहे. बाबाने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे वक्तव्य ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये IITian बाबा म्हणाला, ‘ मी तुम्हाला आधीच सांगतोय, यावेळी भारतीय संघ जिंकणार नाही. एकदा मी म्हणालो ना..जिंकणार नाही, तर जिंकणार नाही. विराट कोहली, भारतीय खेळाडू हा निकाल बदलू शकत नाही. देव मोठा आहे की तुम्ही?…’
२३ फेब्रुवारीला भारत – पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. यापूर्वी आयसीसी टी –२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. आता पुन्हा एकदा हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. हा हाय व्होल्टेज सामना दुबईच्या मैदानावर रंगणार आहे. आता कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.