IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. क्रिकेट चाहते सर्व प्लॅन कॅन्सल करून १०० षटकं टीव्हीसमोर बसून असतात. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रेझ ही वेगळ्याच लेव्हलची आहे. आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या सामन्यात आणि पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट फॅन्सने जोरदार तयारी केली आहे.
या सामन्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो बिहारमधला असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट फॅन्स, भारतीय संघ जिंकावा म्हणून पूजा पाठ करताना दिसून येत आहेत.
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. भारत – पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने बाजी मारावी म्हणून विजयासाठी हवन करण्यात येत आहे. ज्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्रिकेट चाहते एकत्र येऊन भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसून येत आहेत.
मुख्य बाब म्हणजे, या पूजेत पुरुषांसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. हे सर्व व्हिडिओ पाहून हे तर स्पष्ट झालंय ,की भारतात क्रिकेटची क्रेझ कुठल्या लेव्हलची आहे.
#WATCH | Bihar: Cricket fans in Patna perform ‘hawan’ for Team India’s victory as they face Pakistan today in the #ICCChampionsTrophy. #INDvsPAK pic.twitter.com/1WY17qk6MU
— ANI (@ANI) February 23, 2025
या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शामी