Ind vs ban Playing 11: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज भारतीय संघ आपल्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामना हा सर्वच संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाला जर मजबूत स्थितीत पोहोचायचं असेल तर बांगलादेशला धूळ चारावी लागेल.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहितलाही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायची होती, असं त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितलं. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंगला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
अर्शदीप सिंग बाहेर..
भारताचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला या सामन्यासाठी संधी देण्यात आलेली नाही. त्याच्या जागी हर्षित राणाला संधी दिली गेली आहे. अर्शदीप सिंगने संघाला नेहमी चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र या सामन्यात त्याला संधी देण्यात आलेली नाही.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग ११:
तन्झीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव