Ben Duckett Century Against Australia : पाकिस्तानच्या लाहोर स्टेडियमवर आज (२२ फेब्रुवारी) क्रिकेटविश्वातील तगडे संघ, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) आमने सामने होते. या सामन्याचं मुख्य आकर्षण राहिला, इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट (Ben Duckett). त्याने ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजांना घाम फोडत शतकी (Ben Duckett Century) खेळी केली. त्याच्या शतकासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
सलामीवीर डकेटने ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १६५ धावांची शानदार खेळी करत इतिहास रचला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा तो इंग्लंड क्रिकेट संघाचा पहिला फलंदाज बनला आहे. या खास विक्रमात त्याने सध्याच्या दिग्गज फलंदाज जो रूटला मागे सोडले आहे. रूटने २०१७ मध्ये ओव्हल येथे बांगलादेशविरुद्ध नाबाद १३३ धावा केल्या होत्या.
एवढेच नाही तर डकेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा इंग्लंडचा सहावा फलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी जो रूट, मार्कस ट्रेस्कोथिक, अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि बेन स्टोक्स यांनी इंगलंड संघासाठी शतके झळकावली आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोनदा शतक झळकावण्याचा पराक्रम ट्रेस्कोथिकच्या नावावर आहे.
Ben Duckett scores a magnificent century against Australia 🤩💯#ChampionsTrophy #AUSvENG ✍️: https://t.co/DBjsJNDgkY pic.twitter.com/nXSarbR8hN
— ICC (@ICC) February 22, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडसाठी शतके करणारे फलंदाज –
१६५ नाबाद – बेन डकेट – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – लाहोर – २०२५
१३३ नाबाद – जो रूट – विरुद्ध बांगलादेश – द ओव्हल – २०१७
११९ धावा – मार्कस ट्रेस्कोथिक – विरुद्ध झिम्बाब्वे – कोलंबो – २००२
१०४ धावा – अँड्र्यू फ्लिंटॉफ – विरुद्ध श्रीलंका – साउथहॅम्प्टन – २००४
१०४ धावा – मार्कस ट्रेस्कोथिक – विरुद्ध वेस्ट इंडिज द ओव्हल – २००४
१०२ नाबाद – बेन स्टोक्स – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – बर्मिंगहॅम – २०१७
हेही वाचा-
ENG vs AUS: पाकिस्तानची गोची..! ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यात वाजवलं भारताचं राष्ट्रगीत – VIDEO