Most Beautiful Women Tennis Players: भारतात क्रिकेट सह टेनिस खेळाडू सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत चाहते आहेत. अनेक दिग्गज भारतीय टेनिसपटूना भारतीयांनी चांगला मान सन्मान दिला आहे. यात महिला टेनिस पटूचा देखील समावेश आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का सर्वांत सुंदर महिला टेनिसपटू (Most Beautiful Women Tennis Players) कोण आहे?
आजच्या या विशेष फिचरमध्ये आम्ही तुम्हाला 5सर्वांत सुंदर महिला टेनिस पटू विषयी सांगणार आहोत. चला तर मग सुरवात करूया आजच्या या विशेष लेखाला..
Most Beautiful Women Tennis Players: ह्या आहेत 5 सर्वांत सुंदर टेनिसपटू
युजेनी बुचार्ड: कॅनडाची ‘युजेनी बुचार्ड’ ही टेनिस जगातील सर्वात सुंदर महिला खेळाडूंपैकी एक आहे. या उजव्या हाताच्या स्टार खेळाडूने खूप कमी वेळात मोठे नाव कमावले आहे. २०१४ मध्ये युजेनीचे कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग ५ होते. तिला प्रेमाने “जेनले” असेही म्हणतात.
मारिया शारापोवा: टेनिस जगतातील एक असे नाव, जे ऐकताच विरोधक घाबरतात. २००५ मध्ये जगातील नंबर वन टेनिसपटू असलेली मारिया शारापोव्हा तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. या उजव्या हाताच्या खेळाडूने फॅशन जगातही आपला ठसा उमटवला आहे. तिला जगातील सर्वात सुंदर महिला टेनिसपटूं (Most Beautiful Women Tennis Players) पैकी एक मानले जाते.
अॅना इवानोविच: टेनिसच्या जगात क्वचितच कोणी अॅनाचे नाव ऐकले नाही, असे नाही. ती जवळपास प्रत्येकाच्या ओळखीची आहे. मैदानावर नेहमीच आक्रमक दिसणारी अना तिच्या सौंदर्यासाठीही खूप लोकप्रिय आहे. फॅशन जगातही तिची बरोबरी मोठय मोठ्या अभिनेत्रींना येत नाही. २००८ मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली ‘अना’ ही जगातील सर्वात सुंदर महिला खेळाडूंपैकी एक आहे.
कॅरोलिन वोझ्नियाकी: टेनिस जगतात तिच्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कॅरोलिनला कोर्टवर कोणत्याही ओळखीची गरज नाही. मैदानाबाहेरही तिला तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांकडून खूप कौतुक मिळाले आहे. ती नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. एवढेच नाही तर कॅरोलिन २०११ मध्ये जागतिक टेनिस क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर आली आहे.
सानिया मिर्झा: टेनिसबद्दल बोलणे आणि भारतीय टेनिस सेन्सेशन सानिया मिर्झाचे नाव न घेता राहणे अशक्य आहे. सानिया केवळ तिच्या खेळामुळे जगातील टॉप टेनिस खेळाडूंमध्ये नाही तर ती तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.
पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची पूर्व पत्नी टॉप पाच सर्वात सुंदर महिला टेनिसपटूंमध्ये आहे.तिचे सर्वोत्तम रँकिंग एकेरीत २७ आणि दुहेरीत १ आहे. आता सानियाने शोएब मालिकला घटस्फोट दिला असून ती एकटी रहात आहे.
हेही वाचा: