आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक मोठा वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गद्दाफी स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी असलेल्या ७ संघांचा झेंडा असल्याचं दिसून येत आहे. मात्र भारताचा तिरंगा गायब असल्याचं दिसून येत आहे. (ICC Champions Trophy 2025)
आयसीसीच्या नियमानुसार, ज्या देशाकडे स्पर्धेचे यजमानपद असते, त्या देशाला स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व संघातील देशाचा झेंडा लावणे अनिवार्य असते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलचा राग मनात ठेवून भारत सोडून इतर ७ देशांचे झेंडे लावले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
झेंडा न लावल्यामुळे स्पर्धा सुरू होण्याआधीच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहे. त्यामुळे कराचीच्या मैदानावर भारताचा झेंडा लावला नसल्याचं म्हंटलं जात आहे. मात्र कराचीच्या मैदानावर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा एकही सामना होणार नाहीये, तरीदेखील दोन्ही देशांचे झेंडे लावण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानने हे मुद्दाम केलं असल्याचं दिसून येत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये
या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यापासून भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे बीसीसीआयने पाकिस्तानात जाऊन न खेळण्याचा हट्ट लावून धरला. शेवटी पाकिस्तानला भारतासमोर झुकाव लागलं. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. इतकेच नव्हे तर, भारतीय संघाने सेमीफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला, तर हे सामने देखील दुबईत खेळवले जातील.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची?
“मी निवडकर्त्यांना जाऊन…”, टीम इंडियातून डावलल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला Ajinkya Rahane