Yuzvendra Chahal Divorce : भारतीय संघातील फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) आपल्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट होकार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आता चहलला पोटगी (Yuzvendra Chahal Divorce Alimony) रक्कम म्हणून धनश्रीला ६० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.(Dhanashree Varma)
एकीकडे घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना, आता धनश्रीला किती पोटगी रक्कम द्यावी लागणार? अशी चर्चा सुरू आहे. चहल या सर्व अफवांमुळे दुःखी असल्याचं दिसून आले आहे. तर धनश्रीने अशा अफवा पसरवणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. दोघेही सोशल मीडियावर डान्स करत असतानाचे आणि मजेशीर फोटो शेअर करायचे. मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आणि इथूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली. (Yuzvendra chahal divorce with dhanashree Varma)
आधी प्रेम आणि मग लग्न..
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघेही २०२० मध्ये विवाह बंधनात अडकले होते. कोरोना काळ सुरू असताना दोघांची भेट झाली होती. त्यावेळी चहलने धनश्रीला डान्स शिकण्यासाठी संपर्क केला होता. ४ वर्ष सर्वकाही ठीक सुरू होतं. मात्र अचानक दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आणि घटस्फोटाची चर्चा रंगली. दोघांच्याही घटस्फोटाबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या केवळ अफवा असल्याचंही म्हटलं जात आहे.
चहल आणि धनश्रीने आपल्या घटस्फोटाबाबत कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. एकीकडे चहल या अफवांमुळे नाराज आहे. तर धनश्रीने अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे. आता दोघांचा घटस्फोट होणार? की या सर्व अफवा आहेत? हे सर्व लवकरच कळेल.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची?
“मी निवडकर्त्यांना जाऊन…”, टीम इंडियातून डावलल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला Ajinkya Rahane
1 Comment
Pingback: WPL 2025: क्रिकेटमध्ये आता रनआऊट अन् स्टम्पिंगचा नियम बदलला! विकेट घेण्यासाठी आता काय करावं लागणार? ज