Champions Trophy, IND vs PAK: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या प्रतीक्षा आहे ती, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्याची. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात दुबईच्या मैदानावर २३ फ्रेबुवारी रोजी रोमांचक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे आजी-माजी खेळाडू सामन्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच संघावर निशाणा साधत त्यांच्या खेळावर टीका केली आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलच्या (Kamran Akmal) मते पाकिस्तानचा संघ असा आहे की, ‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’ अशी आहे. याशिवाय, जर त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर तो ही एक मोठी कामगिरी मानेल असेही तो म्हणाला.
पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यतांबद्दल अकमलने ‘द हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की, त्यांच्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागेल. अकमल म्हणाला, “पाकिस्तानचा संघ असा आहे की चल जाए तो चांद तक, वरना शाम तक. आमच्या संघात अनेक कमतरता आहेत. गोलंदाजी संघर्षमय आहे. फिरकीपटू नाहीत. सलामीवीर संघर्ष करत आहेत. निवडकर्त्यांना आणि कर्णधाराला काय वाटले ते मला माहित नाही. आमच्या अध्यक्षांनीही मान्यता दिली आहे. चला पाहूया गोष्टी कशा उलगडतात. पण आमच्या संघाच्या तुलनेत इतर संघ अधिक संतुलित दिसत आहेत.”
या स्पर्धेचे यजमानपद भुषवण्याबद्दल बोलताना अकमलने ‘द हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की, ही त्यांच्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अकमल म्हणाला, “ही संपूर्ण देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. १९९६ नंतर आम्ही पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहोत. मला आशा आहे की ही काहीतरी नवीन सुरुवात आहे. जर ही स्पर्धा यशस्वी झाली तर कदाचित आयसीसी आम्हाला आणखी स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी देईल. संपूर्ण देश उत्साहित आहे. जनता स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. वातावरण अगदी ईदसारखे आहे. सगळं काही सुरळीत चालू आहे.”
2 Comments
Pingback: Champions Trophy: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख शिलेदार मायदेशी परतला - Sportswordz.com
Pingback: Champions Trophy 2025 : बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी भारताचा मास्टर प्लॅन तयार! - Sportswordz.com