Ricky Ponting Prediction About Varun Chakravarthy : अलिकडेच यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीचा (Varun Chakravarthy) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) भारतीय संघात समावेश करण्यात आला. यापूर्वी, वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध टी२० आणि वनडे स्वरूपात अद्भुत गोलंदाजी करत स्वत:ला सिद्ध केले होते. मात्र, आता प्रश्न असा आहे की, वरुण चक्रवर्ती (Spinner Varun Chakravarthy) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपली जादू दाखवू शकेल का? आता, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने वरुण चक्रवर्तीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हा गोलंदाज प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास पाँटिगने व्यक्त केला आहे.
‘चक्रवर्तीचे कौशल्य आणि विविधता विरोधी फलंदाजांना रडवेल…’
आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये रिकी पाँटिंगने म्हटले आहे की, चक्रवर्तीचे कौशल्य आणि विविधता विरोधी फलंदाजांना हैराण करुन सोडेल. चक्रवर्ती मोठ्या मंचावर आपली छाप पाडण्यास सज्ज आहे. आतापर्यंत तो फक्त टी२० फॉरमॅटमध्ये खेळत आहे. वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, भारतीय संघात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे फिरकीपटू असतील.
खरे तर, यापूर्वी चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग नव्हता, परंतु नंतर यशस्वी जयस्वालच्या जागी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा भाग म्हणून चक्रवर्तीची निवड करण्यात आली.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आजपासून (19 फेब्रुवारी) सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ एकमेकांसमोर येतील. त्याच वेळी, भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २० फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडशी सामना करेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना २ मार्च रोजी खेळला जाईल.
हेही वाचा-
1 Comment
Pingback: टीम इंडियामध्ये फूट? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी स्टार खेळाडू प्रशिक्षक गंभीरवर नाराज | Team India - Sportswordz.com