Team India News : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचे (Team India Controversy) नाव एका नवीन वादात जोडले गेले आहे. भारतीय संघात (Team India) सर्वकाही अलबेल नसल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान आता एका स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर आरोप केले असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.
असा दावा केला जात आहे की हा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे, जो प्रशिक्षक गंभीरवर खूप नाराज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियामध्ये फुटीच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? ते पाहूया.
भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरवर नाराज!
खरं तर, बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अनेक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती, ज्यामध्ये सर्व खेळाडूंना टीम बसमध्ये प्रवास करावा लागेल, कोणीही त्यांच्या जोडीदाराला छोट्या दौऱ्यावर घेऊन जाऊ शकत नाही आणि दौऱ्याच्या मध्यभागी कोणतेही वैयक्तिक फोटोशूट होणार नाही, यांचा समावेश होता. दरम्यान,आता अशी बातमी समोर येत आहे की एक भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वनडे सामन्याच्या प्लेइंग-११ मधून आपल्याला वगळल्यावरुन त्यांच्यावर नाराज आहे.
‘टाईम्स नाऊ’मधील एका वृत्तानुसार, रिषभ पंत सध्या गौतम गंभीरच्या निर्णयांवर खूश नाही. रिपोर्ट्सनुसार, असा दावा करण्यात आला आहे की टीम इंडियाचा एक यष्टीरक्षक गंभीरवर नाराज आहे कारण त्याला वनडे सामन्याच्या प्लेइंग-११ मध्ये पहिली पसंती देण्यात आली नव्हती. आता, असे मानले जाते की हा दावा पंतकडे बोट दाखवत आहे कारण केएल राहुल आधीच संघात पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर गंभीरने स्वतः हे स्पष्ट केले होते, तर पंत हा संघातील दुसरा पसंतीचा यष्टिरक्षक आहे.
केएल राहुल पॉवर हिटिंगवर लक्ष केंद्रित करतो
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल त्याच्या मोठ्या फटकेबाजी कौशल्यावर लक्ष केंद्रित करत आहे. राहुल हा सामान्यतः त्याच्या फलंदाजीच्या तांत्रिक दृष्टिकोनासाठी ओळखला जातो. मात्र आता तो सरावात त्याची फलंदाजी शैली बदलताना दिसला. त्याने आक्रमक फटके खेळण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा ‘हा’ फिरकीपटू विरोधी फलंदाजांना फोडेल घाम, पाँटिंगची भविष्यवाणी