Rohit Sharma Apologizes To Axar Patel : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या पहिल्या साखळी फेरी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. बऱ्याच दिवसांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने काही महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू अक्षर पटेलनेही (Axar Patel) बांगलादेशच्या फलंदाजांना घाम फोडला. यामन्यादरम्यान फिरकी गोलंदाज अक्षरकडे (Axar Patel Missed Hattrick) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिली हॅटट्र्रिक घेण्याची संधी होती. परंतु कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चुकीमुळे ही संधी हुकली. त्यानंतर रोहितने असे काही केले, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
त्याचे झाले असे की, बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. त्याने दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने तन्जीद हसनला यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने मुशफिकुर रहीमला भोपळाही न फोडू देता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता अक्षरला हॅटट्रिकसाठी फक्त एक विकेट घ्यायची होती. फलंदाज झाकीर अली त्याच्या समोर होता. अक्षरचा चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला आणि स्लिपवर उभ्या असलेल्या कर्णधार रोहितकडे गेला. रोहितसाठी हा झेल सोपा होता, पण त्याने घाईघाईत हा झेल सोडला. परिणामी अक्षरची विकेट्सची हॅटट्रिक हुकली.
Rohit Sharma apologizes after dropping a catch on Axar Patel’s hat-trick ball. The emotions say it all! 💔
📸: JioHotstar pic.twitter.com/6fHUfAb6h8
— Cricket Innovators (@ShivamGupta1043) February 20, 2025
पण आपल्या हातून झेल सुटल्याचा रोहितला खूप पश्चात्ताप झाला. त्याने निराशेच्या भरात हात मैदानावर आपटले आणि जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. यानंतर रोहितने अक्षर पटेलची हात जोडून माफी मागितली. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
When child fell on the floor
Parents – 😭#IndvsBan #RohitSharma pic.twitter.com/45AYRCBOAQ
— PatrickBateman⚔️ (@SERIALDEBUGGER) February 20, 2025
..तर अक्षरने इतिहास रचला असता
जर रोहितने हा झेल घेतला असता तर अक्षर पटेलने इतिहास रचला असता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला असता. याशिवाय, तो आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरला असता.
हेही वाचा –
Ind vs Ban: बांगलादेशने टॉस जिंकत घेतला बॅटिंगचा निर्णय! रोहितने मेन बॉलरला बसवलं; पाहा प्लेइंग ११
1 Comment
Pingback: IND Vs BAN : शमी-राणाच्या वेगापुढे बांगलादेशचे फलंदाज गारद, भारताला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य - Sportswordz.com