Rohit Sharma Record: भारताचा कर्णधार रोहित शर्माने दुबईच्या मैदानावर इतिहास रचला. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ताबडतोड सुरुवात करून दिली. चौकार मारून त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात करून दिली. यादरम्यान रोहितने ११००० धावा पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. यादरम्यान मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे.
विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनंतर वनडे क्रिकेटमध्ये ११००० धावांचा पल्ला गाठणारा रोहित चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह जगभरात केवळ ६ फलंदाज आहेत, ज्यांना वनडे क्रिकेटमध्ये ११००० धावांचा पल्ला गाठता आला आहे. ज्यात जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा, सनाथ जयसुर्या, महेला जयवर्धने आणि इंजमाम उल हक यांचा समावेश आहे
असा रेकॉर्ड करणारा रोहित दुसराच फलंदाज
रोहितने ११००० धावांचा पल्ला गाठला. यादरम्यान तो जगातील दुसरा सर्वात जलद ११००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने २६१ डावात हा पल्ला गाठला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २७६ डावात हा कारनामा केला होता. या यादीत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये ११००० धावांचा पल्ला २२२ व्या डावात गाठला होता.
भारताचा दमदार विजय
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून गिलने नाबाद १०१ आणि केएल राहुलने ४१ धावांची खेळी करत भारतीय संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.
1 Comment
Pingback: मोठी बातमी! सौरव गांगुलीच्या कारला भीषण अपघात, कसा आहे माजी कर्णधार? Sourav Ganguly Accident - Sportswordz.com