ENG vs AUS: पाकिस्तानला एक काम खूप चांगलं जमतं, ते म्हणजे जगासमोर आपली खिल्ली उडवून घेणं. पाकिस्तान क्रिकेट संघाने नेहमी असं काही केलं आहे ज्यामुळे त्यांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS Match) असा सामना रंगला. या सामन्यापूर्वी असं काही घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
लाहोरच्या मैदानावर वाजलं भारताचं राष्ट्रगीत
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार पाकिस्तानात सुरू आहे. मात्र हायब्रीड मॉडेल असल्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत सुरू आहेत. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले. ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत संपल्यानंतर इंग्लंडचं राष्ट्रगीत वाजवलं जाणार होतं. पण भारताचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं. त्यानंतर स्टेडियमध्ये एकच जल्लोष झाला.
Pakistan by mistakenly played Indian National Anthem during England Vs Australia #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/31D7hA6i6n
— hrishikesh (@hrishidev22) February 22, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफिचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र तरीदेखील भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानला दुबईत यावं लागलं आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. हा भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. भारतीय संघाने जर सेमी फायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला, तर हे दोन्ही सामने देखील दुबईत खेळवले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महत्वपूर्ण सामना
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दोन्ही संघ ग्रुप बी मध्ये आहेत. या ग्रुप मध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ देखील आहेत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा धुव्वा उडविला आहे.
हेही वाचा-