Rohit Sharma : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा (Champions Trophy 2025) खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफिमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय फलंदाज कसून सराव करताना दिसून येत आहेत. रोहितनेही (Rohit Sharma) नेट्समध्ये घाम गाळला. दरम्यान रोहितचा नेट्समध्ये फलंदाजी केल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
रोहित (Captain Rohit Sharma) नेट्समध्ये ज्या गोलंदाजाविरुद्ध सराव करत होता. तो गोलंदाज रोहितला इनस्विंग यॉर्कर टाकत होता. जे रोहितच्या पायाला जाऊन लागत होते. रोहितने फलंदाजीचा सराव झाल्यानंतर त्या गोलंदाजासोबत गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना त्याने युवा गोलंदाजाचं कौतुक केलं. यासह त्याच्याशी मजेशीर संवादही साधला.
काय म्हणाला रोहित शर्मा?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात रोहित शर्मा नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासोबत चर्चा करताना दिसतोय. त्यावेळी रोहित म्हणतो, ‘ क्लास गोलंदाजी केलीस.. इनस्विंग यॉर्कर टाकून तू माझी बूटं आणि पाय तोडण्याचा प्रयत्न करत होतास. खूप चांगली गोलंदाजी..तुम्ही इथे येताय आम्हाला मदत करताय.. आम्हाला खूप चांगलं वाटलं. धन्यवाद..’
रोहित फॉर्ममध्ये परतला..
भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून फलंदाजीत संघर्ष करताना दिसून येत होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्ध झालेल्या कटक वनडेतून त्याने दमदार कमबॅक केलं. या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये रोहित शर्माचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.
हेही वाचा –
Champions Trophy 2025 : बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी भारताचा मास्टर प्लॅन तयार!