AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

Champions Trophy 2025 video: पाकिस्तानचे घृणास्पद काम, मुद्दाम सर्व देशांचा झेंडा लावला मात्र भारतीय झेंडा लावला नाही, नवा वाद वाढणार?

Champions Trophy 2025 video: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यातील संघर्षात आता एक नवीन वळण लागले आहे . आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) चे यजमान असलेल्या  पाकिस्तानने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर भारतीय ध्वज न फडकावून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Champions Trophy 2025 video: पाकिस्तानने सर्व देशांचे झेंडे लावले मात्र भारतीय ध्वज नाही लावला..

कोणत्याही स्पर्धेच्या यजमान देशाला सर्व संघांचे झेंडे फडकवणे बंधनकारक आहे. परंतु असे असूनही, भारतीय ध्वज वगळता सर्व सात देशांचे झेंडे लाहोरमध्ये फडकवण्यात आले. पाकिस्तानच्या या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कराचीमध्ये भारतीय ध्वज फडकावला गेला नाही..

पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या समस्यांना तोंड देणाऱ्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सामने खेळण्यास नकार देणाऱ्या फक्त भारतीय संघालाच सामोरे जावे लागल्याने, पीसीबीने कराची स्टेडियमवरून भारतीय ध्वज काढून टाकला आणि इतर पाहुण्या खेळाडू देशांचे ध्वज कायम ठेवले आहेत.

Champions Trophy 2025 video: पाकिस्तानचे घृणास्पद काम, मुद्दाम सर्व देशांचा झेंडा लावून भारतीय झेंडा लावला नाही, विडीओ होतोय तुफान व्हायरल..!

पाकिस्तानच्या या कृत्यामुळे आता भारतीय चाहते चांगलेच संतापले आहेत  आणि त्यांनी पाकिस्तान ला ट्रोल करायला सुरवात केली आहे. असे असले तरी अद्याप मात्र पाकिस्तान कडून भारतीय झेंडा नक्की का काढण्यात आला? यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीये .. मात्र स्टेडियमचा तो व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.


हेही वाचा:

Fastest 100 wickets taker bowlers in ODI: या 6 गोलंदाजांनी घेतलेत एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 100 विकेट्स, एकाने तर खेळलेत केवळ एवढेच सामने..!

Divorced Cricket Players: धनश्री आणि चहलच्या घटस्फोटाच्या बातम्या खऱ्या ठरल्या तर, युजीची होणार घटस्फोटीत प्लेईंग 11 मध्ये इंट्री,पहा घटस्फोटीत टीम इंडिया..!

Leave a Comment