Champions Trophy Semi Final Scenario: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये जाण्याची चुरस वाढली आहे. ग्रुप ए बद्दल बोलायचं झालं, तर या गटात ४ संघ आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या ४ संघांचा समावेश आहे. या चारही संघांनी आपले १–१ सामने खेळले आहेत. यापैकी भारत आणि न्यूझीलंडला विजय मिळवता आला आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या गटातून कोणते ४ संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार? जाणून घ्या.
पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाणार का?
ग्रुप ए मध्ये न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर भारताचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी १ –१ सामने जिंकले आहेत. तर नेट रनरेटच्या आधारे बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा संघ सर्वात शेवटी आहे. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानचा पुढील सामना २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. तर २७ फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध होणार आहे. पाकिस्तानला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. यासह इतर संघांवर देखील अवलंबून राहावं लागणार आहे.
कसं आहे पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण?
पाकिस्तानचे पुढील २ सामने बांगलादेश आणि भारतासोबत होणार आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. जर पाकिस्तानने पुढील दोन्ही सामने जिंकले तरीदेखील पाकिस्तानला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे पाकिस्तानला केवळ जिंकाव नाही, तर मोठ्या फरकाने जिंकावं लागेल.