AdBlocker Detected !

It Seems That You Are Using An Ad Blocker/VPN/Proxy/Custom DNS. Please Consider Disabling It To Support Our Website.

Note : Brave Browser Is Not Supported On Our Website.

Once You're Done, Refresh The Page.

हार्दिकला चीअर करण्यासाठी दुबईत पोहोचली नवी ‘लेडी लव्ह’, गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल | Hardik Pandya

Hardik Pandya Alleged Girlfriend Spotted : भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात हार्दिकने पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत वाहवाह लुटली. यावेळी हार्दिकची कथित प्रेयसी (Hardik Pandya Girlfriend) दुबईच्या स्टेडियममध्ये बसून त्याला चीअर करताना दिसली. यानंतर ती तरुणी कोण आहे? याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे.

त्याचे झाले असे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजीची सुरुवात फारशी खास नव्हती, पण हार्दिक डावातील नववे षटक टाकण्यासाठी येताच त्याने बाबर आझमची विकेट घेऊन टीम इंडियाला पहिला ब्रेक दिला.

बाबरच्या विकेटसोबतच हार्दिकने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले ते अद्भुत होते. यावेळी अचानक टीव्ही स्क्रीनवर एक चेहरा दिसला ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले. खरंतर, ती दुसरी तिसरी कोणी नसून हार्दिकची कथित प्रेयसी जास्मिन वालिया (Jasmine Walia) होती. भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना पाहण्यासाठी जास्मिन वालिया दुबईतील स्टेडियममध्ये आली होती. हार्दिकने बाबर आझमची विकेट घेताच जास्मिन वालियाने आनंदाने उड्या मारल्या.

कोण आहे हार्दिकची कथित प्रेयसी?
जास्मिन वालिया ही भारतीय वंशाची ब्रिटिश गायिका आहे. तिने बॉलिवूड चित्रपटांनाही आपला आवाज दिला आहे. तिच्या गायनाव्यतिरिक्त, जास्मिन हार्दिकसोबतच्या तिच्या नात्यामुळेही चर्चेत आहे. हार्दिकचा गेल्या वर्षीच त्याची माजी पत्नी नताशा स्टॅन्कोविकशी घटस्फोट झाला. नताशाशी घटस्फोट घेतल्यानंतर, हार्दिक सोशल मीडियावर अशा ठिकाणी दिसला जिथे जास्मिन देखील सुट्टीसाठी गेली होती. दोघांनीही त्याच ठिकाणचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हार्दिक आणि जास्मिनच्या नात्याची चर्चा यामुळेच तीव्र झाली होती. अशा परिस्थितीत, दुबईतील सामन्यांत जास्मिनला पाहिल्यानंतर आता त्यांचे नाते पक्के झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा-

IND vs PAK : रिझवानने गोलंदाज राणाला मुद्दाम मारला खांदा, भारत-पाक सामन्यात जोरदार राडा

Leave a Comment