Author: shweta Chidamalwad

IND vs PAK Highlights: यजमान पाकिस्तान संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाविरुद्ध झालेला सामना हा पाकिस्तानसाठी करो या मरो सामना होता. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानकडे स्पद्धेत टिकून राहण्याची संधी होती. मात्र ही संधी पाकिस्तानने गमावली. दरम्यान विराट कोहलीच्या शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या २४१ धावांवर आटोपला. या डावात पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम…

Read More

Axar Patel Wicket : पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानावर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यात भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजी करताना पाकिस्तानी कर्णधाराची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्याबरोबरच अक्षरने क्षेत्ररक्षणातही अवलिया प्रदर्शन केले. त्याच्या योगदानामुळे भारतीय संघ पाकिस्तानला २४१ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान अक्षरच्या एका विकेटची मात्र भरपूर चर्चा होत आहे. त्याचे झाले असे की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची पहिली विकेट हार्दिक पंड्याने घेतली. त्याने बाबर आझमला बाद केले. त्यानंतर एकेरी धाव घेण्याच्या नादात दुसरा सलामीवीर इमाम उल हकने आपली विकेट गमावली. अक्षर पटेलने डायरेक्ट थ्रो करत पाकिस्तानच्या दुसऱ्या सलामीवीराचा खेळ खल्लास केला. अक्षर…

Read More

Hardik Pandya Alleged Girlfriend Spotted : भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात हार्दिकने पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत वाहवाह लुटली. यावेळी हार्दिकची कथित प्रेयसी (Hardik Pandya Girlfriend) दुबईच्या स्टेडियममध्ये बसून त्याला चीअर करताना दिसली. यानंतर ती तरुणी कोण आहे? याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. त्याचे झाले असे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजीची सुरुवात फारशी खास नव्हती, पण हार्दिक डावातील नववे षटक टाकण्यासाठी येताच त्याने बाबर आझमची विकेट घेऊन टीम इंडियाला पहिला ब्रेक…

Read More

IND vs PAK : आज (२३ फेब्रुवारी) दुबईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रोमांचक लढत झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील या हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वादही पाहायला मिळाले. पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad RIzwan) आणि भारतीय गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) यांच्यातील राड्याने तर क्रिकेटप्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्यातील माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदीतील वादाची आठवण करुन दिली. सामन्यादरम्यान रिझवानने मुद्दाम राणाला खांदा मारला. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर राडा पाहायला मिळाला. त्याचे झाले असे की, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. ४९.४ षटकांत सर्व विकेट्स गमावत यजमानांनी भारतापुढे २४२ धावांचे लक्ष्य ठेवले.…

Read More

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. क्रिकेट चाहते सर्व प्लॅन कॅन्सल करून १०० षटकं टीव्हीसमोर बसून असतात. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रेझ ही वेगळ्याच लेव्हलची आहे. आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या सामन्यात आणि पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट फॅन्सने जोरदार तयारी केली आहे. या सामन्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो बिहारमधला असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट फॅन्स, भारतीय संघ जिंकावा म्हणून पूजा पाठ करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर काय…

Read More

Ind vs Pak Playing XI: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (champions trophy 2025) स्पर्धेत आज क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा सामना रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर आज भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ भिडणार आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारत विजयाने श्रीगणेशा केला होता. तर यजमान पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या प्लेइंग ११ बदल होणार हे जवळजवळ निश्चित आहे. तर भारताच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल होणार नाही. कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी ताप आला आहे. त्यामुळे तो सराव करण्यासाठी देखील मैदानावर…

Read More

Danish Kaneria Trolled Babar Azam : बाबर आझम (Babar Azam) हा बऱ्याच काळापासून पाकिस्तान क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. त्याची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. आता त्याच्यावरील दबाव आणखी वाढला आहे, कारण २३ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा सामना भारताशी (IND vs PAK) होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने बाबर आझमला स्वार्थी म्हणत नवा वाद निर्माण केला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ३२१ धावांचे मोठे लक्ष्य गाठायचे होते. मोठे लक्ष्य असूनही, बाबर आझमने ९० चेंडूत ६४ धावांची अतिशय संथ खेळी केली. या संथ खेळीमुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. बाबर…

Read More

Virat Kohli Injury: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत रविवारी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. भारतीय खेळाडू दुबईतील आयसीसी अकॅडेमीत सराव करत आहेत. विराट कोहली संघातील इतर खेळाडूंपेक्षा १ तास आधीच सराव करण्यासाठी दाखल झाला होता. त्याने मैदानावर कसून सराव केला. यादरम्यान त्याच्या पायाला चेंडू लागला. त्यामुळे तो पायाला आईस पॅक लावताना दिसून आला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शनिवारी भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. सर्वात आधी सरावासाठी मैदानात आलेल्या विराट कोहलीच्या पायाला चेंडू लागल्यानंतर तो मैदानाबाहेर जाऊन बसला. तो पायाला…

Read More

IND vs PAK : २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. मात्र त्यातील रविवारचा सामना खूप खास आहे. २३ फेब्रुवारी रोजी, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. हा हाय व्होल्टेज सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय उपकर्णधार शुभमन गिलने टीम इंडियाच्या योजनांबद्दल माहिती दिली आहे. एवढेच नाही तर गिलने एक वाईट बातमीही दिली आहे. गिलने संघ स्कोअरबद्दल काय विचार करत आहे ते सांगितले पाकिस्तानविरुद्धच्या रंगतदार सामन्यापूर्वी पूर्वसंध्येला उपकर्णधार गिलने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरुद्ध भारताच्या योजनांचा खुलासा करताना…

Read More

Ben Duckett Century Against Australia : पाकिस्तानच्या लाहोर स्टेडियमवर आज (२२ फेब्रुवारी) क्रिकेटविश्वातील तगडे संघ, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) आमने सामने होते. या सामन्याचं मुख्य आकर्षण राहिला, इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट (Ben Duckett). त्याने ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजांना घाम फोडत शतकी (Ben Duckett Century) खेळी केली. त्याच्या शतकासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सलामीवीर डकेटने ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १६५ धावांची शानदार खेळी करत इतिहास रचला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा तो इंग्लंड क्रिकेट संघाचा पहिला फलंदाज बनला आहे. या खास विक्रमात त्याने सध्याच्या दिग्गज फलंदाज जो रूटला मागे सोडले आहे. रूटने २०१७…

Read More