Divorced Cricket Players: आजचा काळ असा आहे की लोक नातेसंबंधांपेक्षा त्यांच्या करिअरला आणि इतर गोष्टींना जास्त महत्त्व देतात. त्यामुळे आजच्या काळात लोकांचे नाते फार काळ टिकत नाही. विशेषत: हे सेलिब्रिटींसोबत अधिक घडते. अलीकडेच स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanshree Verma) यांच्याबाबतही असेच काहीसे ऐकायला मिळत होते.
क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanshree Verma) घेणार घटस्फोट?
तो आणि त्याची पत्नी धनश्रीबद्दल अशी बातमी आहे की दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. तसंच चहानने धनुश्रीचे सर्व फोटो आपल्या अकाउंटवरून डिलीट केले आहेत. ज्यानंतर गोष्टी अधिक तीव्र झाल्या आहेत.
यापूर्वी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबतही असेच काहीसे घडले होते. तर आज या लेखात आम्ही तुम्हालाभारतीय संघातील त्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्याचा त्यांच्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे.
अनेक वेळा आपल्या कामगिरीने आणि फॉर्मने देशाला आणि चाहत्यांना आनंदी करणाऱ्या खेळाडूंचे आयुष्य आपल्याला वाटते तितके आनंदी नसते. त्यांच्या आयुष्यातही काही संकटे येतात ज्याची कोणालाच माहिती नसते. सदैव आनंदी असणारा भारतीय संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलच्या आयुष्यातही असेच काहीसे घडत आहे.
Divorced Cricket Player: युजवेंद्र चहल आधी या भारतीय खेळाडूंचा झाला आहे घटस्फोट.
भारतीय संघातील घटस्फोट झालेल्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, नुकतेच वेगळे झालेले हार्दिक पांड्या आणि नताशा यांचे नाव समोर येते. हार्दिकने गेल्या वर्षीच नताशापासून घटस्फोट घेतला आहे. यानंतर हार्दिकला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या यादीत त्याआधी स्टार सलामीवीर शिखर धवनने नाव होते. धवनला त्याच्या पत्नीनेदेखील घटस्फोट दिला आहे.
त्याआधी भारतीय फलंदाज दिनेश कार्तिक, विनोद कांबळी, पाकिस्तानचे खेळाडू इम्रान खान, शोएब मलिक यांच्या नावांचा समावेश आहे.
या 11 खेळाडूंचा झाला आहे घटस्फोट ( Divorced Cricket Players List)
शिखर धवन, ग्रॅमी स्मिथ, विनोद कांबळी, मोहम्मद अझरुद्दीन, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, इम्रान खान, शोएब मलिक, शेन वॉर्न, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल.