Nita Ambani On Hardik Pandya : पंड्या बंधू हे आज भारतीय क्रिकेटमधील मोठे नाव आहेत. अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या भारतीय संघाच्या प्रमुख अष्टपैलूंपैकी एक आहे. येत्या आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पंड्याच्या संघर्षमय दिवसांपासून ते पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन संघाचा कर्णधार बनण्यापर्यंतच्या प्रवासाची आठवण करून दिली आहे.
दशकापूर्वी हार्दिक (Hardik Pandya) आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना, नीता यांनी मुंबई इंडियन्स स्काउटिंग सिस्टमने या प्रतिभांचा शोध कसा घेतला आणि त्यांची प्रगती कशी केली? याबद्दल सांगितले.
नीता अंबानी म्हणाल्या, “आयपीएलमध्ये आपल्या सर्वांचे एक निश्चित बजेट असते. त्यामुळे प्रत्येक संघ निश्चित रक्कम खर्च करू शकतो. आम्हाला प्रतिभा शोधण्याचे नवीन मार्ग शोधावे लागले. म्हणून मला आठवतंय की मी प्रत्येक रणजी ट्रॉफी सामन्यात प्रतिभा शोधण्यासाठी जायचे. मी माझ्या स्काउट्ससोबत देशांतर्गत क्रिकेट सामने पाहायला जायचे. मग एके दिवशी आमच्या स्काउट्सनी दोन तरुण मुलांना कॅम्पमध्ये आणले जे खूप खूप सडपातळ होते.”
नीता अंबानी यांनी क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवण्यापूर्वी पंड्या बंधूंनी त्यांचे संघर्षमय दिवस कसे घालवले? याबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, “मी हार्दिक आणि कृणालशी बोलत होते. त्यांनी सांगितले की तीन वर्षांपासून त्यांनी मॅगीशिवाय दुसरे काहीही खाल्ले नाही कारण त्यांच्याकडे तितके पैसे नव्हते. पण मला त्यांच्यात काहीतरी मोठे करण्याची आवड आणि भूक दिसली. ते दोन भाऊ हार्दिक आणि कृणाल पंड्या होते. २०१५ मध्ये, मी हार्दिक पांड्याला लिलावात १०,००० अमेरिकन डॉलर्सना विकत घेतले आणि आज तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे,” अशा शब्दांत नीता अंबानींनी हार्दिकचे कौतुक केले.
हेही वाचा-