IND vs BAN Live Score : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील (Champions Trophy) दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा (IND vs BAN) संघ २ चेंडू शिल्लक असताना २२८ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशच्या सलामीवीरांचा टिकाव लागला नाही. तौहिद हृदॉयच्या झुंजार शतकी खेळीने बांगलादेशची लाज राखली. आता भारतीय संघाला (IND vs BAN, Champions Trophy) विजयासाठी २२९ धावांचे आव्हान मिळाले आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी रोहितची ब्रिगेड प्रथम गोलंदाजीसाठी मैदानावर उतरली. १०४ वनडे सामन्यांचा अनुभव असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराच्या विश्वासावर खरा उतरला. शमीने अर्धशतक केलेल्या जाकर अलीची महत्त्वपूर्ण विकेट संघाला मिळवून दिली. १० षटके टाकताना ५३ धावा देत त्याने बांगलादेशचा अर्धा संघ (५ विकेट्स) पव्हेलियनला पाठवला.
Innings Break!
Bangladesh are all out for 2⃣2⃣8⃣
5⃣ wickets for Mohd. Shami
3⃣ wickets for Harshit Rana
2⃣ wickets for Axar PatelOver to our batters 💪
Scorecard ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/zgCnFuWSwi
— BCCI (@BCCI) February 20, 2025
शमीसह नवखा वेगवान गोलदाज हर्षित राणानेही ३ विकेट्स काढल्या. यामध्ये शतकवीर तौहिद हृदॉयच्या महत्त्वपूर्ण विकेटचाही समावेश आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेलनेही एकामागोमाग एक अशा दोन विकेट्स घेतल्या. कर्णधार रोहित शर्माने सोपा झेल सोडल्यामुळे त्याची विकेट्सच्या हॅटट्रिकची संधी हुकली.
बांगलादेशकडून केवळ तौहिद हृदॉयने मोठी खेळी केली. तो २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १०० धावा करुन बाद झाला. तसेच जाकर अलीनेही ६८ धावांची संथ खेळी केली. याशिवाय बांगलादेशचे इतर फलंदाज मात्र सपशेल फेल ठरले.
हेही वाचा-
“बापू चुकलो…”, लाईव्ह सामन्यात रोहितने हात जोडून मागितली अक्षरची माफी | Rohit Sharma Video