IND vs PAK : आज (२३ फेब्रुवारी) दुबईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रोमांचक लढत झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील या हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वादही पाहायला मिळाले. पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad RIzwan) आणि भारतीय गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) यांच्यातील राड्याने तर क्रिकेटप्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्यातील माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदीतील वादाची आठवण करुन दिली.
सामन्यादरम्यान रिझवानने मुद्दाम राणाला खांदा मारला. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर राडा पाहायला मिळाला.
त्याचे झाले असे की, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. ४९.४ षटकांत सर्व विकेट्स गमावत यजमानांनी भारतापुढे २४२ धावांचे लक्ष्य ठेवले. डावाच्या सुरुवातीला सलामीवीर इमाम-उल-हक (१० धावा) आणि बाबर आझम (२३ धावा) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार रिझवानने ४६ धावांची संथ खेळी केली. यादरम्यान रिझवान आणि भारतीय गोलंदाज हर्षित राणा यांच्यात छोटासा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
रिझवान मैदानावर असताना डावाच्या २०व्या षटकात हर्षित राणा गोलंदाजी करत होता. त्यावेळी रिझवानने शॉट खेळला आणि तो एकेरी धाव घेण्यासाठी धावत होता. त्यावेळी हर्षित पुढे चालत होता. पण रिझवान एकेरी धाव पळत असताना त्याचा खांदा हर्षितच्या खांद्याला लागला. हे पाहून हर्षित चिडला. त्याने त्यावर रिझवानला प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, ही घटना घडली, त्यावेळी लगेचच कॅमेरा भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडेही गेला. गंभीरचीही अनेकदा मैदानात पाकिस्तानी खेळाडूंसोबत भांडणं झाली आहेत.
Md. Rizwan collide with Harshit Rana .
And Harhit dont control his emotion and that we want .Recreate Gambhir-Afridi Moment
#INDvsPAK #ChampionTrophy2025 pic.twitter.com/5pRDBliPuX
— Bowler 🆚 Batsman (@ICT__buzz) February 23, 2025
Kalesh b/w Harshit Rana and Rizwan: pic.twitter.com/DEs1wkiIyp
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 23, 2025
Harshit rana and Mohammad Rizwan shoulder to shoulder…. its heating in dubai🥵🥵#INDvsPAK #ChampionsTrophy pic.twitter.com/N9kucdOJwF
— Rahul Karki (@Rahulkarki417) February 23, 2025
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारताच्या गोलंदाजांपुढे पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानकडून साऊद शकीलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तसेच कर्णधार रिझवानने ४६ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना मात्र चांगली धावसंख्या करता आली नाही. भारताकडून या डावात कुलदीप यादवने ३ आणि हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. अक्षऱ पटेलनेही त्याच्या क्षेत्ररक्षणासह सर्वांना चकित केले.
हेही वाचा-
IND vs PAK: जिंकणार तर टीम इंडियाच! भारताच्या विजयासाठी फॅन्सकडून पुजा-पाठ, पाहा VIDEO
2 Comments
Pingback: हार्दिकला चीअर करण्यासाठी दुबईत पोहोचली नवी 'लेडी लव्ह', गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल | Hardik Pandya - Sports
Pingback: 'बापू'चा डायरेक्ट थ्रो..! डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत पाकिस्तानी फलंदाजाचा करेक्ट कार्यक्