IND vs PAK, Champions Trophy : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची क्रेझ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने असतील तर क्रिकेटप्रेमींसाठी ती पर्वणीच असते. दोन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम सुरू होतोय. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला आहे, मात्र सर्वांना प्रतीक्षा आहे ती २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याची.
आता अशी बातमी समोर येत आहे की, दुबईतील या रंगतदार सामन्याच्या तिकिटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. चक्क ४ लाख रुपयांमध्ये तिकीट विकले जात आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत लाखोंमध्ये…
हायब्रीड मॉडलमुळे भारतीय क्रिकेट संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने युएईत खेळवले जाणार आहेत. काळ्या बाजारात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे लाखोंमध्ये विकली जात आहेत. एका वेबसाइटवर दुबईच्या ग्रँड लाउंजच्या तिकिटाची किंमत ४ लाख २९ हजार रुपये आहे. त्याच वेळी, त्याच मैदानाच्या ग्रँड लाउंजमध्ये एका चांगल्या सीटची किंमत सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत पोहोचत आहे. दुबई स्टेडियमच्या ग्रँड लाउंजमधून सामन्याचे सर्वोत्तम दृश्य पाहता येऊ शकते.
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यांच्या किमतींमध्ये काळाबाजार काही नवीन नाही. २०२४ च्या टी२० विश्वचषकादरम्यान, या सामन्याच्या तिकिटाची किंमत काळ्या बाजारात १६ लाखांपर्यंत पोहोचली होती. इतकेच नाही तर अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की सामन्याच्या तिकिटाची किंमत १.८६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्या तुलनेत, दुबईमध्ये या किमती पुन्हा खूपच कमी दिसत आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी चाहते उत्सुक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी वातावरण पूर्णपणे तयार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ शेवटचे २०१७ मध्ये आमनेसामने आले होते. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत यंदा पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामना कोण जिंकणार? हे पाहणे रंजक ठरेल.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची?
“मी निवडकर्त्यांना जाऊन…”, टीम इंडियातून डावलल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला Ajinkya Rahane
1 Comment
Pingback: Champions Trophy आधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? नेमकं काय घडलं? - Sportswordz.com