IPL 2025 Timetable: जगातील सर्वांत मोठी टी-20 स्पर्धा आयपीएल २०२५ चे वेळापत्रक १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १३ ठिकाणी खेळवली जाईल.
पहिला सामना केकेआर आणि आरसीबी (KKR vs RCB) यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलकाता येथे खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जातील.
Indian squad for Champions Trophy finalized.
Harshit Rana & Varun Chakravarthy will replace Yashasvi Jaiswal
& injured Jasprit Bumrah.
Yashasvi, Mohammed Siraj & Shivam Dube will be non-travelling substitutes.#ChampionsTrophy #JaspritBumrah #HarshitRana #VarunChakravarthy pic.twitter.com/eDvCZ8vWLl— बातम्या खेळांच्या (@Surendra21286) February 11, 2025
IPL 2025 Timetable: २३ मार्च रोजी मोठी लढाई
आयपीएल २०२५ मध्ये, ५ वेळा विजेते चेन्नई सुपर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना २३ मार्च रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांचे चाहते प्रचंड आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळला जाईल.
आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकातील नॉकआउट सामन्याचा पहिला क्वालिफायर सामना २० मे रोजी खेळवला जाईल, तर एलिमिनेटर सामना २१ मे रोजी खेळवला जाईल. याशिवाय, क्वालिफायर २ २३ मे रोजी खेळवला जाणार आहे. क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने हैदराबादमध्ये खेळवले जातील. तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना कोलकाता येथे खेळवला जाईल.
आयपीएल २०२५ साठी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या संघात मोठे बदल केले आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात, सर्व संघांनी त्यांच्या संघात अनेक स्टार खेळाडूंना समाविष्ट केले. ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, फाफ डू प्लेसिससारखे स्टार खेळाडू नवीन संघातून खेळताना दिसतील.
२ संघांचे कर्णधार अद्याप जाहीर होने बाकी!
आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या १० संघांनी त्यांच्या संघात अनेक मोठे बदल केले आहेत. तथापि, अजूनही असे २ संघ आहेत ज्यांनी त्यांचा कर्णधार जाहीर केलेला नाही. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.
हेही वाचा: