Hardik Pandya : आयपीएल २०२५ (IPL 2025) स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेच्या १७ व्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आमनेसामने येणार आहेत. यासह मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रकही समोर आलं आहे. मुंबईचा पहिला सामना २३ मार्चला चैन्नईविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
पहिल्या सामन्यात रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व?
मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या हंगामात शेवटी राहिला होता. या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नव्हता. त्यामुळे साखळी फेरीतील सामना मुंबईचा शेवटचा सामना ठरला होता. मुंबईचा संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनऊविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्यावर स्लो ओव्हर रेटची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ३० लाख रुपये दंड आणि १ सामन्याची बंदी घातली गेली होती. ती बंदी या हंगामातही कायम असणार आहे.
आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले गेले होते की, ‘ हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर ३० लाखांचा दंड आकारला गेला आहे. यासह त्याच्यावर एक सामन्याची बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे तो पुढील हंगामातील पहिला सामना खेळू शकणार नाही.’ त्यामुळे मुंबईला पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या शिवाय खेळाव लागेल.
कोण होणार मुंबईचा कर्णधार?
मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतील एकमेव संघ आहे, ज्यात भारतीय संघातील सर्व कर्णधार खेळताना दिसून येत आहेत. रोहित शर्मा हा वनडे संघाचा कर्णधार आहे. तर जसप्रीत बुमराह कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. तर सूर्यकुमार यादव हा टी –२० संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची?
“मी निवडकर्त्यांना जाऊन…”, टीम इंडियातून डावलल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला Ajinkya Rahane