Pak vs Nz: घरच्या मैदानावर खेळताना पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने ५० षटकअखेर ३२० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Icc champions trophy)
पाकिस्तानचा दारुण पराभव
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर ३२० धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३२१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या २६० धावांवर आटोपला. यासह न्यूझीलंडने हा सामना ६० धावांनी आपल्या नावावर केला.
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून खुशदिल शाहने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर बाबर आझमने ६४ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने पाकिस्तानचा डाव गडगडला.
Clinical New Zealand down Pakistan in #ChampionsTrophy 2025 opener 👏#PAKvNZ 📝: https://t.co/E5MS83KLLA pic.twitter.com/JpcqY5664Q
— ICC (@ICC) February 19, 2025
न्यूझीलंडने उभारला ३२० धावांचा डोंगर..
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना टॉम लेथमने सर्वाधिक ११८ धावांची खेळी केली. तर विल यंगने १०७ धावा चोपल्या. शेवटी ग्लेन फिलिपने आक्रमक फलंदाजीचा तडका लावला. त्याने ६१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ३२० वर पोहोचवली.
पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडचे फलंदाज चमकले. त्यानंतर गोलंदाजीतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मिचेल सेंटनर आणि विलियम ओ रूकने सर्वाधिक प्रत्येकी ३–३ गडी बाद केले. तर मॅट हेनरीने २ आणि ब्रेसवेल आणि स्मिथने प्रत्येकी १–१ गडी बाद केले.
1 Comment
Pingback: Champions Trophy : पाकिस्तानला दुहेरी धक्का, पहिल्या पराभवानंतर स्फोटक फलंदाज स्पर्धेतून बाहेर? - Sportswordz.com