Sourav Ganguly Accident News : माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कारला अपघात झाला आहे. दुर्गापूर एक्सप्रेस वेवरून तो त्याच्या ताफ्यासह बर्दवानला एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सौरव गांगुली (Sourav Ganguly News) थोडक्यात बचावला आहे.
माध्यमांतील वृत्तासार, त्यांच्या ताफ्याच्या मध्यभागी एक लॉरी आली, ज्यामुळे गाड्यांना आपत्कालीन ब्रेक लावावे लागले. ज्यामुळे गाड्या एकमेकांना धडकल्या. मात्र, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या अपघातात गांगुली किंवा त्याच्या कोणत्याही साथीदाराला दुखापत झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांच्या ताफ्यातील गाड्या सुसाट वेगात नव्हत्या, परंतु एका लॉरीने अचानक कट मारल्याने चालकाने जोरदार ब्रेक लावला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी संतुलन गमावले आणि एक गाडी थेट गांगुलींच्या रेंज रोव्हरवर आदळली. दादपूर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात गांगुली आणि त्याच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही.
गांगुली बर्दवान विद्यापीठात जात होता
अपघातानंतर, गांगुलीला काही मिनिटे रस्त्यावर वाट पहावी लागली, त्यानंतर तो कार्यक्रमासाठी निघून गेला. तो बर्दवान विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होणार होता.
सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या मालिका जिंकल्या आणि परदेशातही त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना हरवले आहे. तो भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक आहे.
हेही वाचा-