Axar Patel Wicket : पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानावर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यात भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजी करताना पाकिस्तानी कर्णधाराची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्याबरोबरच अक्षरने क्षेत्ररक्षणातही अवलिया प्रदर्शन केले. त्याच्या योगदानामुळे भारतीय संघ पाकिस्तानला २४१ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान अक्षरच्या एका विकेटची मात्र भरपूर चर्चा होत आहे.
त्याचे झाले असे की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची पहिली विकेट हार्दिक पंड्याने घेतली. त्याने बाबर आझमला बाद केले. त्यानंतर एकेरी धाव घेण्याच्या नादात दुसरा सलामीवीर इमाम उल हकने आपली विकेट गमावली. अक्षर पटेलने डायरेक्ट थ्रो करत पाकिस्तानच्या दुसऱ्या सलामीवीराचा खेळ खल्लास केला.
अक्षर पटेलच्या क्षेत्ररक्षणाचा अद्भुत नजराणा
अक्षरने पाकिस्तानच्या डावातील दहाव्या षटकात आपल्या क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इमामने पुढे येऊन मिड ऑनच्या दिशेनं फटका खेळला. त्यानंतर त्याने लगेच एकेरी धाव घेण्यासाठी मैदान सोडले. पण अक्षरने एकदम वेगाने चेंडू पकडला आणि स्टंपवर अचूक निशाणा साधत पाकिस्तानच्या संघाला दुसरा धक्का देत भारतीय संघाला मोठा दिलासा दिला. इमाम उल हक २६ चेंडूचा सामना करून अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्याला एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही.
याबरोबरच अक्षरने हारिस राऊफलाही धावबाद केले.
𝘽𝙐𝙇𝙇𝙎𝙀𝙔𝙀! 🎯💥
Axar Patel with a stunning direct hit and Imam-ul-Haq is caught short! A moment of brilliance in the #GreatestRivalry—can Pakistan recover from this setback? 👀🔥#ChampionsTrophyOnJioStar 👉 🇮🇳 🆚 🇵🇰 | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star… pic.twitter.com/vkrBMgrxTi
— Star Sports (@StarSportsIndia) February 23, 2025
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारताच्या गोलंदाजांपुढे पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानकडून साऊद शकीलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तसेच कर्णधार रिझवानने ४६ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना मात्र चांगली धावसंख्या करता आली नाही. भारताकडून या डावात कुलदीप यादवने ३ आणि हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. अक्षऱ पटेलनेही त्याच्या क्षेत्ररक्षणासह सर्वांना चकित केले.
हेही वाचा-
IND vs PAK : रिझवानने गोलंदाज राणाला मुद्दाम मारला खांदा, भारत-पाक सामन्यात जोरदार राडा