IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत (Champions Trophy 2025) जगभरातील क्रिकेटपटूंना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) या महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. क्रिकेटजगतातील कट्टर प्रतिद्वंद्वी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ (IND vs PAK, Champions Trophy) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (23 फेब्रुवारी) आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ बलशाली आहे, कोणता संघ हा सामना जिंकेल याबद्दल क्रिकेट तज्ञ अंदाज वर्तवत आहेत. यादरम्यान पाकिस्तानचा माजी दिग्गज शाहीन आफ्रिदी याने आपल्याच संघाला कमी लेखले आहे.
आफ्रिदीच्या मते भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान दुबळा आहे. पाकिस्तानच्या संघात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कमी असल्याचेही आफ्रिदीने सांगितले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, स्पर्धेच्या अधिकृत प्रसारकाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यामध्ये शाहिद आफ्रिदी, युवराज सिंग, इंझमाम-उल-हक आणि नवजोत सिंग सिद्धू सारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान संघाबद्दल बोलताना आफ्रिदी म्हणाला, “जर आपण मॅचविनर्सबद्दल बोललो तर मी म्हणेन की भारतीय संघात पाकिस्तानपेक्षा जास्त मॅचविनर्स आहेत. सामना जिंकणारा खेळाडू म्हणजे असा खेळाडू जो स्वबळावर सामना कसा जिंकायचा? हे जाणतो. सध्या पाकिस्तानमध्ये असे खेळाडू नाहीत. भारताची ताकद त्यांच्या मधल्या आणि खालच्या फळीतील खेळाडूंमध्ये आहे, जे त्यांना सामने जिंकून देत आहेत. आम्ही बऱ्याच काळापासून खेळाडूंना संधी देत आहोत, परंतु कोणीही सातत्याने पुढे जाऊ शकलेले नाही. काहींनी काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु आमच्याकडे असे खेळाडू नाहीत जे सातत्याने दमदार प्रदर्शन करत आहेत. आमच्याकडे असा एकही खेळाडू नाही ज्याने एक-दोन वर्षे किंवा ५०-६० सामने त्याची कामगिरी कायम ठेवली आहे. या क्षेत्रात खूप मजबूत असलेल्या भारताच्या तुलनेत आम्ही इथे थोडे कमकुवत आहोत.”
“पण भारताविरुद्धच्या विजयाची गुरुकिल्ली म्हणजे सामूहिक कामगिरी. फलंदाज असो, गोलंदाज असो किंवा फिरकी गोलंदाज असो, प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे,” असेही यावेळी आफ्रिदीने म्हटले.
आता भारत-पाकिस्तान सामन्यात कोणता संघ कुणावर भारी पडतो? हे पाहावे लागेल.
हेही वाचा-
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक झटका, आयसीसीने ठोठावला दंड | Pakistan Team