Author: shweta Chidamalwad

ENG vs AUS: पाकिस्तानला एक काम खूप चांगलं जमतं, ते म्हणजे जगासमोर आपली खिल्ली उडवून घेणं. पाकिस्तान क्रिकेट संघाने नेहमी असं काही केलं आहे ज्यामुळे त्यांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS Match) असा सामना रंगला. या सामन्यापूर्वी असं काही घडलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लाहोरच्या मैदानावर वाजलं भारताचं राष्ट्रगीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार पाकिस्तानात सुरू आहे. मात्र हायब्रीड मॉडेल असल्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत सुरू आहेत. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड…

Read More

Ind vs Pak: प्रयागराजमध्ये महाकुंबमेळा सुरू आहे. या मेळ्यात तुफान चर्चेत असलेले बाबा म्हणणे, IITian बाबा. आयआयटी मुंबईतून आपलं शिक्षण पूर्ण करून, चांगल्या पगाराची नोकरी सोडून IITian बाबाने साधू बनण्याचा निर्णय घेतला. जेव्हापासून या बाबाचा व्हिडीओ व्हायरल झालाय, तेव्हापासून हा बाबा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता या बाबाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. व्हिडिओ होतोय व्हायरल सध्या IITian बाबाची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. या बाबाने भारत – पाकिस्तान सामन्याबाबात मोठी भविष्यवाणी केली आहे. बाबाने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे वक्तव्य ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.…

Read More

Ind vs Pak Match Details: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सर्वात मोठा सामना येत्या रविवारी रंगणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. ज्या क्षणाची सर्वच क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. तो भारत – पाकिस्तान सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याचा नाणेफेक दुपारी २ वाजता होईल. तर २:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील दुसरा…

Read More

Champions Trophy Semi Final Scenario: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये जाण्याची चुरस वाढली आहे. ग्रुप ए बद्दल बोलायचं झालं, तर या गटात ४ संघ आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या ४ संघांचा समावेश आहे. या चारही संघांनी आपले १–१ सामने खेळले आहेत. यापैकी भारत आणि न्यूझीलंडला विजय मिळवता आला आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या गटातून कोणते ४ संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार? जाणून घ्या. पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाणार का? ग्रुप ए मध्ये न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर भारताचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी १ –१ सामने जिंकले आहेत. तर…

Read More

SA vs AFG: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आतापर्यंत २ रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील तिसरा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. यासह दक्षिण आफ्रिकेने ५० षटकअखेर ३१५ धावांचा डोंगर उभारला आहे. दुबईची फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी आणि अनुभवी फिरकीपटूंची भरमार असलेल्या अफगाणिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. हा निर्णय कुठेतरी फसतो की काय, असं वाटत असताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ताबडतोड फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेला…

Read More

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत (Champions Trophy 2025) जगभरातील क्रिकेटपटूंना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) या महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. क्रिकेटजगतातील कट्टर प्रतिद्वंद्वी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ (IND vs PAK, Champions Trophy) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (23 फेब्रुवारी) आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ बलशाली आहे, कोणता संघ हा सामना जिंकेल याबद्दल क्रिकेट तज्ञ अंदाज वर्तवत आहेत. यादरम्यान पाकिस्तानचा माजी दिग्गज शाहीन आफ्रिदी याने आपल्याच संघाला कमी लेखले आहे. आफ्रिदीच्या मते भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान दुबळा आहे. पाकिस्तानच्या संघात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कमी असल्याचेही आफ्रिदीने सांगितले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, स्पर्धेच्या अधिकृत…

Read More

ICC Punished Pakistan Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील (ICC Champions Trophy 2025) न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानपुढे (Pakistan) आता भारतीय संघाचे आव्हान असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात २३ फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर रंगतदार लढत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. तत्पूर्वी पाकिस्तान संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध षटकांची गती कमी राखल्याबद्दल (Slow Over Rate) पाकिस्तानला गुरुवारी (२० फेब्रुवारी) त्यांच्या सामन्याच्या शुल्काच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला. स्पर्धेचा यजमान आणि गतविजेत्या पाकिस्तानला बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध ६० धावांनी पराभव…

Read More

Sourav Ganguly Accident News : माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) कारला अपघात झाला आहे. दुर्गापूर एक्सप्रेस वेवरून तो त्याच्या ताफ्यासह बर्दवानला एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सौरव गांगुली (Sourav Ganguly News) थोडक्यात बचावला आहे. माध्यमांतील वृत्तासार, त्यांच्या ताफ्याच्या मध्यभागी एक लॉरी आली, ज्यामुळे गाड्यांना आपत्कालीन ब्रेक लावावे लागले. ज्यामुळे गाड्या एकमेकांना धडकल्या. मात्र, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या अपघातात गांगुली किंवा त्याच्या कोणत्याही साथीदाराला दुखापत झाली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांच्या ताफ्यातील गाड्या सुसाट वेगात नव्हत्या, परंतु एका लॉरीने अचानक कट मारल्याने चालकाने जोरदार ब्रेक लावला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी संतुलन गमावले…

Read More

Rohit Sharma Record: भारताचा कर्णधार रोहित शर्माने दुबईच्या मैदानावर इतिहास रचला. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ताबडतोड सुरुवात करून दिली. चौकार मारून त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात करून दिली. यादरम्यान रोहितने ११००० धावा पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. यादरम्यान मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनंतर वनडे क्रिकेटमध्ये ११००० धावांचा पल्ला गाठणारा रोहित चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह जगभरात केवळ ६ फलंदाज आहेत, ज्यांना वनडे क्रिकेटमध्ये ११००० धावांचा पल्ला गाठता आला आहे. ज्यात जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा, सनाथ जयसुर्या, महेला जयवर्धने आणि इंजमाम उल हक यांचा समावेश आहे असा रेकॉर्ड…

Read More

Ind vs Ban Highlights: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या २२९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि केएल राहुलच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह विजयी सुरुवात केली. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. कारण ५० धावांच्या आत बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता.…

Read More