Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shweta Chidamalwad
IND vs BAN Live Score : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील (Champions Trophy) दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा (IND vs BAN) संघ २ चेंडू शिल्लक असताना २२८ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशच्या सलामीवीरांचा टिकाव लागला नाही. तौहिद हृदॉयच्या झुंजार शतकी खेळीने बांगलादेशची लाज राखली. आता भारतीय संघाला (IND vs BAN, Champions Trophy) विजयासाठी २२९ धावांचे आव्हान मिळाले आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी रोहितची ब्रिगेड प्रथम गोलंदाजीसाठी मैदानावर उतरली. १०४ वनडे सामन्यांचा अनुभव असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराच्या विश्वासावर खरा उतरला. शमीने अर्धशतक केलेल्या जाकर अलीची महत्त्वपूर्ण…
Rohit Sharma Apologizes To Axar Patel : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या पहिल्या साखळी फेरी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. बऱ्याच दिवसांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने काही महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू अक्षर पटेलनेही (Axar Patel) बांगलादेशच्या फलंदाजांना घाम फोडला. यामन्यादरम्यान फिरकी गोलंदाज अक्षरकडे (Axar Patel Missed Hattrick) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिली हॅटट्र्रिक घेण्याची संधी होती. परंतु कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चुकीमुळे ही संधी हुकली. त्यानंतर रोहितने असे काही केले, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे झाले असे की, बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. त्याने दुसऱ्याच चेंडूवर…
Ind vs ban Playing 11: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज भारतीय संघ आपल्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामना हा सर्वच संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाला जर मजबूत स्थितीत पोहोचायचं असेल तर बांगलादेशला धूळ चारावी लागेल. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहितलाही…
Champions Trophy, Fakhar Zaman : यजमान पाकिस्तान संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions trophy 2025) स्पर्धेची सुरुवात लाजिरवाण्या पराभवाने झाली आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) कराचीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा (PAK vs NZ) ६० धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर स्पर्धेतून (Champions Trophy Updates) बाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान आता यजमान संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा धाकड सलामीवीर फखर जमान (Fakhar Zaman) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती…
Pak vs Nz: घरच्या मैदानावर खेळताना पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने ५० षटकअखेर ३२० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Icc champions trophy) पाकिस्तानचा दारुण पराभव या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर ३२० धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३२१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या २६० धावांवर आटोपला. यासह न्यूझीलंडने हा…
PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ Match) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कराचीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने असं काही केलं जे पाहून तुम्हाला चिड आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय घडलं? तर झाले असे की, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेला डेवोन कॉनव्हे आणि केन विलियम्सन दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यांनतर विल यंगच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. त्याने…
Pak vs NZ Live Score: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि बलाढ्य न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर ५ गडी बाद ३२० धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, यजमान पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. डेवोन कॉनव्हे १० तर अनुभवी केन विलियम्सन अवघ्या १ धावेवर माघारी परतला. त्यानंतर डॅरिल मिशेलही अवघ्या १० धावांवर…
Team India News : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचे (Team India Controversy) नाव एका नवीन वादात जोडले गेले आहे. भारतीय संघात (Team India) सर्वकाही अलबेल नसल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान आता एका स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर आरोप केले असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. असा दावा केला जात आहे की हा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे, जो प्रशिक्षक गंभीरवर खूप नाराज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियामध्ये फुटीच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? ते पाहूया. भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरवर नाराज! खरं तर, बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अनेक…
Ricky Ponting Prediction About Varun Chakravarthy : अलिकडेच यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीचा (Varun Chakravarthy) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) भारतीय संघात समावेश करण्यात आला. यापूर्वी, वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध टी२० आणि वनडे स्वरूपात अद्भुत गोलंदाजी करत स्वत:ला सिद्ध केले होते. मात्र, आता प्रश्न असा आहे की, वरुण चक्रवर्ती (Spinner Varun Chakravarthy) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपली जादू दाखवू शकेल का? आता, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने वरुण चक्रवर्तीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हा गोलंदाज प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास पाँटिगने व्यक्त केला आहे. ‘चक्रवर्तीचे कौशल्य आणि विविधता विरोधी फलंदाजांना रडवेल…’ आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये रिकी पाँटिंगने म्हटले आहे की, चक्रवर्तीचे कौशल्य…
Champions Trophy IND vs PAK Record : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम आजपासून (19 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. कराचीच्या मैदानावर यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती, 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) हाय व्होल्टेज सामन्याची. क्रिकेटविश्वातील कट्टर प्रतिद्वंद्वी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी राहिला आहे. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास (IND vs PAK Head To Head Record) काय आहे? आणि कोणता संघ कुणावर वरचढ राहिला आहे?, हे आपण येथे जाणून घेणार आहोत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 1998 मध्ये सुरू…