Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shweta Chidamalwad
Rohit Sharma : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा (Champions Trophy 2025) खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफिमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय फलंदाज कसून सराव करताना दिसून येत आहेत. रोहितनेही (Rohit Sharma) नेट्समध्ये घाम गाळला. दरम्यान रोहितचा नेट्समध्ये फलंदाजी केल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रोहित (Captain Rohit Sharma) नेट्समध्ये ज्या गोलंदाजाविरुद्ध सराव करत होता. तो गोलंदाज रोहितला इनस्विंग यॉर्कर टाकत होता. जे रोहितच्या पायाला जाऊन लागत होते. रोहितने फलंदाजीचा सराव झाल्यानंतर त्या गोलंदाजासोबत गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना…
Champions Trophy, IND vs BAN Match: भारतीय क्रिकेट संघ सध्या दुबईत असून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या मोहिमेसाठी जोरदार तयारी करत आहे. यंदा भारतीय संघाकडे १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ करणार आहे. दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाने तगडी योजना आखली आहे. भारताचा मास्टर प्लॅन काय आहे? इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने आपला मास्टर प्लॅन दाखवला होता. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी प्लेइंग ११ मध्ये तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. भारत पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्ध…
Nita Ambani On Hardik Pandya : पंड्या बंधू हे आज भारतीय क्रिकेटमधील मोठे नाव आहेत. अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या भारतीय संघाच्या प्रमुख अष्टपैलूंपैकी एक आहे. येत्या आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पंड्याच्या संघर्षमय दिवसांपासून ते पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन संघाचा कर्णधार बनण्यापर्यंतच्या प्रवासाची आठवण करून दिली आहे. दशकापूर्वी हार्दिक (Hardik Pandya) आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना, नीता यांनी मुंबई इंडियन्स स्काउटिंग सिस्टमने या प्रतिभांचा शोध कसा घेतला आणि त्यांची प्रगती कशी केली? याबद्दल सांगितले. नीता अंबानी म्हणाल्या, “आयपीएलमध्ये आपल्या…
Champions Trophy, IND vs PAK: जगभरातील क्रिकेटपटूंना सध्या प्रतीक्षा आहे ती, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्याची. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात दुबईच्या मैदानावर २३ फ्रेबुवारी रोजी रोमांचक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे आजी-माजी खेळाडू सामन्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच संघावर निशाणा साधत त्यांच्या खेळावर टीका केली आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलच्या (Kamran Akmal) मते पाकिस्तानचा संघ असा आहे की, ‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’ अशी आहे. याशिवाय, जर त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर तो ही एक मोठी कामगिरी मानेल असेही…
Morne Morkel Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy) स्पर्धा सुरू व्हायला २४ तासांहूनही कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. तर भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचं (Team India) टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल स्पर्धेच्या एक दिवसाआधी अचानक मायदेशी परतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, मॉर्ने मॉर्कल वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला आहे. मात्र खरं कारण अजून कळू शकलेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाहता मॉर्ने…
WPL 2025 : महिला प्रीमियर लीग स्पर्धेत (WPL 2025) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान रनआउटच्या निर्णयावरून चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ३ निर्णय चुकीचे दिले गेले होते. मुख्य बाब म्हणजे हे तिन्ही निर्णय मुंबई इंडियन्सच्या विरोधात गेले. आता महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या नियमात मोठा बदल केला जाणार आहे. इथून पुढे रनआऊट घेतला किंवा स्टम्पिंग केल्यास फक्त एलईडी लाईट पेटणं पुरेसं नसेल, तर बेल्स पूर्णपणे खाली पडणंही तितकंच गरजेचं असणार आहे. यापूर्वी लाईट पेटली की फलंदाज बाद असा निर्णय दिला जायचा, मात्र यापुढे असं होणार नाही. काय सांगतो क्रिकेटचा नियम?…
Yuzvendra Chahal Divorce : भारतीय संघातील फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) आपल्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चहल आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट होकार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान आता चहलला पोटगी (Yuzvendra Chahal Divorce Alimony) रक्कम म्हणून धनश्रीला ६० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.(Dhanashree Varma) एकीकडे घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना, आता धनश्रीला किती पोटगी रक्कम द्यावी लागणार? अशी चर्चा सुरू आहे. चहल या सर्व अफवांमुळे दुःखी असल्याचं दिसून आले आहे. तर धनश्रीने अशा अफवा पसरवणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. दोघेही सोशल मीडियावर डान्स करत असतानाचे आणि…
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एक मोठा वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गद्दाफी स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी असलेल्या ७ संघांचा झेंडा असल्याचं दिसून येत आहे. मात्र भारताचा तिरंगा गायब असल्याचं दिसून येत आहे. (ICC Champions Trophy 2025) आयसीसीच्या नियमानुसार, ज्या देशाकडे स्पर्धेचे यजमानपद असते, त्या देशाला स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व संघातील देशाचा झेंडा लावणे अनिवार्य असते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलचा राग मनात ठेवून भारत सोडून इतर ७ देशांचे झेंडे लावले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. झेंडा…
Hardik Pandya : आयपीएल २०२५ (IPL 2025) स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेच्या १७ व्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आमनेसामने येणार आहेत. यासह मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रकही समोर आलं आहे. मुंबईचा पहिला सामना २३ मार्चला चैन्नईविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या हंगामात शेवटी राहिला होता. या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नव्हता.…
IND vs PAK, Champions Trophy : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची क्रेझ जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने असतील तर क्रिकेटप्रेमींसाठी ती पर्वणीच असते. दोन दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम सुरू होतोय. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला आहे, मात्र सर्वांना प्रतीक्षा आहे ती २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याची. आता अशी बातमी समोर येत आहे की, दुबईतील या रंगतदार सामन्याच्या तिकिटांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. चक्क ४ लाख रुपयांमध्ये तिकीट विकले जात आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत लाखोंमध्ये… हायब्रीड मॉडलमुळे भारतीय क्रिकेट संघाचे चॅम्पियन्स…